मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८

अहंमपणा...

       प्रत्येक माणसाला स्व अस्तित्व असत. मग तो गरीब असो या श्रीमंत. काही लोकांना बडेजाव करण्याची सवय असते .  मीपणा, माझ्याशिवाय या जगाच काही खर नाही अस त्याला वाटायला लागत.तो स्वतः त्याच्याच दुनियेत जगत असतो.त्याला वाटत माझ्याइतका हुशार मिच पण जग चंद्रावर गेलेल असत अन् हा मात्र उंदरावर बसून तारे मोजत असतो.

शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८

                                             संस्कार
आपण जीवन जगत असताना खरी गरज असते ती
संस्काराची. बऱ्याचदा मी अशी काही मुले बघीतली
आहेत की ती अभ्यासात खूप हुशार असतात पण त्यांच
इतरांशी जमत नाही. ती मित्रांशी सलोख्याने वागत नाहीत.
      जिजाऊने शिवरायांना घडविले.  नुसते स्वराज्य स्थापन
करुन चालणार नाही तर ते कसे चांगले टिकले पाहिजे रयत कशी सुखी झाली पाहिजे याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दिली.
     संस्कारात सर्वात महत्त्वाचे योगदान असते ते म्हणजे आई वडिलांचे त्यांनी आपल्या मुलांना वेळोवेळी योग्य दिशा देण्याचे काम केले पाहिजे.