शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

अतिवृष्टी

                   अतिवृष्टी

आज म्हणे अतिवृष्टी होणार आहे
हवामानाचा अंदाज खरा होणार आहे ।।धृ।।

हे काय आश्चर्य घडतय,
हवामान खात खर ठरतय,
पहिल्यांदाच अस होणार आहे,
हवामान खात्याच खर होणार आहे... ।।१।।

हवामान खात्याचा अंदाज खरा होणार आहे,
शेतकऱ्याच्या पिकाला भरभराटी येणार आहे,
महाराष्ट्रातील दुष्काळ नाहीसा होणार आहे,
माझा बळीराजा सुखी होऊन पोळा साजरा करणार आहे,
आज म्हणे अतिवृष्टी होणार आहे... ।।२।।
             - मोहन आनंदराव ढगे

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

मी एक मुंगी- बा.सी मर्ढेकर

 मी एक मुंगी, हा एक मुंगी
तो एक मुंगी, तूर एक मुंगी
ही एक मुंगी, ती एक मुंगी,
पाच एथल्या, पाच फिरंगी,

सहस्र झाल्या, लक्ष,  कोटिही,
अब्ज अब्ज अन् निखर्व  मुंग्या,
कुणी पंखाच्या पावसाळी वा
बेडर ग्रीष्मांतल्या लवंग्या!